कधी वाटते समुद्र किनारी बसावे
तुला भेटावे हातात हात घालुनी
खूप काही बोलावे तुला जवळ घेउनी
पण मन म्हणते थांब जरा
तिला ते आवडेल का ते पाहू दे
कधी वाटते तुला कवेत घ्यावे
नजरेत तुझ्या नजर मिळवुनी
बाहुपाशात थांबावे, ओठांवर ओठ ठेउनी
पण मन म्हणते थांब जरा
तिची इच्छा आहे का ते पाहू दे
कधी वाटते तुला मनातले सांगावे
तुझ्याजवळ प्रेम प्रकट करावे
तुझ्या अंतःकरणात शिरून
तेथेच नेहमी वास्त्यव्य करावे
कधी वाटते तुझ्या दुःखाचा डोंगर फोडून
तुला सुखाच्या वातावरणात आणावे
आणि मग फक्त तुझ्या सोबतीने
एक नवीन जीवन सुरु करावे
मग मन म्हणते थांब जरा
मला हि तुझ्या सोबत येऊ दे
- Unkonwn
तुला भेटावे हातात हात घालुनी
खूप काही बोलावे तुला जवळ घेउनी
पण मन म्हणते थांब जरा
तिला ते आवडेल का ते पाहू दे
कधी वाटते तुला कवेत घ्यावे
नजरेत तुझ्या नजर मिळवुनी
बाहुपाशात थांबावे, ओठांवर ओठ ठेउनी
पण मन म्हणते थांब जरा
तिची इच्छा आहे का ते पाहू दे
कधी वाटते तुला मनातले सांगावे
तुझ्याजवळ प्रेम प्रकट करावे
तुझ्या अंतःकरणात शिरून
तेथेच नेहमी वास्त्यव्य करावे
कधी वाटते तुझ्या दुःखाचा डोंगर फोडून
तुला सुखाच्या वातावरणात आणावे
आणि मग फक्त तुझ्या सोबतीने
एक नवीन जीवन सुरु करावे
मग मन म्हणते थांब जरा
मला हि तुझ्या सोबत येऊ दे
- Unkonwn
No comments:
Post a Comment